Home Breaking News रेतीची तस्करी करणारे दोघे अटकेत

रेतीची तस्करी करणारे दोघे अटकेत

790

5 लाखाचा मुद्देमाल जप्त

वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वारगाव ते मेंढोली मार्गावर रात्री च्या सुमारास अवैधरित्या रेती ची ट्रॅकरने वाहतूक करण्यात येत होती. याबाबत माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तालुक्यात रेतीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अधिकृत रित्या रेती घाट सुरू झाले नाही त्यामुळे तालुक्यातील नदी नाल्या मधील रेती चोरून विक्री केल्या जात आहे. ट्रॅक्टर चालक मालकांनी आपला मोर्चा रेती तस्करीकडे वळविल्याने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात येत आहे.

सोमवार दि 31 जानेवारीला ठाणेदार गजानन करेवाड यांना रेतीचा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. वारगाव ते मेंढोली रस्त्यावर सापळा रचून MH-34-L -4853 या क्रमांकाच्या ट्रकर ची तपासणी केली असता त्यामध्ये एक ब्रास रेती आढळून आली.

चालक मनोज भीमराव पुसनाके (30) रा. मेंढोली याला ताब्यात घेण्यात आले त्याच बरोबर प्रशासनाने कारवाई करू नये म्हणून ट्रॅक्टर च्या समोर मोटरसायकलने पायलटिंग करत असलेला घनश्याम माधव गारगोटे रा. वारगाव यालाही दुचाकी सह ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी 5 लाख 53 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाही सपोनि ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडूरे, सुगत दिवेकर, सुनील दुबे, राजन ईसनकर, अभिजीत कोषटवार यांनी केली आहे.
वणी: बातमीदार