● प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांचे कौतुक
वणी | शुक्रवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत येथील सुशगंगा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश संपादन केले.

सुशगंगा मधील विराली रूहाटिया हिने 92.06 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच रूचित ठाकूर याने 86 टक्के, तेजस्विनी राखुंडे 84.06, हिमांशी भावनानी 82.08, व्यंकट गुथा 76.06, क्रिष्णा जयस्वाल याने 76 टक्के प्राप्त करून यश मिळविले.
प्रावीण्य श्रेणीत आलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार, शाळेचे व्यवस्थापक मोहन बोनगीरवार, प्राचार्य प्रवीण दुबे यांनी या यशाबद्दल कौतुक केले.
वणी: बातमीदार