Home Breaking News उच्चभ्रू एरियात चोरट्यांचा शिरकाव, लक्ष्मीनगरमध्ये घरफोडी

उच्चभ्रू एरियात चोरट्यांचा शिरकाव, लक्ष्मीनगरमध्ये घरफोडी

● सव्वाचार लाखाचा ऐवज लंपास

C1 20250428 18232045

सव्वाचार लाखाचा ऐवज लंपास

Crime News | लक्ष्मीनगर, नांदेपेरा रोड येथे सोमवारी 28 एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्याने घरफोडी करून सुमारे 4 लाख 13 हजार 500 रुपयांचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोनु रविंद्र बरडे (29) रा. लक्ष्मीनगर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. An incident occurred in which a thief broke into a house and stole gold and silver jewelry worth about Rs 4 lakh 13 thousand 500.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बरडे यांचे घर कुलूपबंद असताना, रात्री 12 ते पहाटे 5 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याची कडी-कोंडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये 10 व 20 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गोप, सोन्याच्या दोन अंगठ्या, मंगळसूत्र, कानातले, जिवती, रिंग तसेच चांदीचे चाळ, छला आणि करदोडा यांचा समावेश आहे. एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे 4लाख 13 हजार 500 रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात BNS कलम 331 (4), 305 (A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाणे हे पुढील तपास करीत आहेत.
Rokhthok News