● मंगळवारी झाला थाटात शुभारंभ
रोखठोक | विदर्भातील अग्रगण्य श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा झंझावात सुरूच आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल उपाध्यक्ष जेसाभाऊ मोटवाणी यांच्या हस्ते मंगळवार दि. 20 डिसेंबरला 16 व्या शाखेचे थाटात शुभारंभ करण्यात आला.
वडसा येथे 16 व्या शाखेच्या शुभारंभ व उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, उपाध्यक्ष विवेक मांडवकर, कार्यकारी प्रबंधक संजय दोरखंडे, वडसा देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष शालु दंडवते, किसन नागदेवे, तालुका काँग्रेस कमिटीचे डॉ. विनोद नाकाडे, नगरसेवक दीपक झरकर, उद्योजक रवींद्र सिंग सलुजा, संदीप कोयटे, माधवराव पाटील, संस्थेचे संचालक मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल प्रचंड मोठया स्वरूपाची आहे. तब्बल 800 कोटीच्या ठेवी, 451 कोटी कर्ज वाटप व 872 कोटी खेळते भांडवल असलेल्या या विशाल वटवृक्ष रुपी संस्थेत 58 हजार सभासद आहेत. संस्थेच्या वणी, मारेगाव, मुकुटबन, वणी ग्रामीण, यवतमाळ, आर्णी, घाटंजी, चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, मूल, वरोरा, गडचांदूर, चिमूर, ब्राह्मपुरी या ठिकाणी शाखा कार्यरत आहे.
श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वडसा (देसाईगंज) येथील नवीनतम शाखेचा शुभारंभ व उदघाटन प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सभासद, स्थानिक ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.
वणी : बातमीदार