Home Breaking News विष पाजून तीन बैलांना केले ठार

विष पाजून तीन बैलांना केले ठार

पेटूर येथील घटना

रोखठोक | तालुक्यातील पेटूर या गावी अज्ञात समाजकंटकाने बैलांना विष पाजले. यात तिन्ही बैल दगावले असून ही घटना गुरुवार दि 22 डिसेंबरला रात्री घडली.

पेटूर या गावी गणपत ठावरी यांचे शेत आहे. गावाच्या लगतच गुरे बांधण्यासाठी त्यांचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांचे इतर जनावरां सोबतच तीन बैल देखील बांधले होते.

IMG 20260511 WA0005

अज्ञात समाज कंटकाने या तीन बैलांना थीमेट नावाचे विषारी औषध पाजले. त्यामूळे या तिन्ही बैलांचा मृत्यू झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घडलेली घटना अतिशय गंभीर असून त्या अज्ञात समाजकंटकाचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसां पुढे उभे आहे.
वणी : बातमीदार

Img 20250103 Wa0009