Home Breaking News त्याने…नदीत उडी मारून केली ‘आत्महत्या’

त्याने…नदीत उडी मारून केली ‘आत्महत्या’

● निर्गुडा नदीतील मोटार पुलाजवळची घटना

2859

निर्गुडा नदीतील मोटार पुलाजवळची घटना

रोखठोक | शहरातील मैल खड्डा, शास्त्रीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या 37 वर्षीय व्यक्तीने निर्गुडा नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. 11 एप्रिलला सायंकाळी 5: 30 वाजता उघडकीस आली. A 37-year-old man committed suicide by jumping into the Nirguda river.

Img 20250422 wa0027

विनोद भादेकर (37) असे मृतकाचे नाव असून तो मैल खड्डा, शास्त्रीनगर परिसरात वास्तव्यास होता. पूर्वाश्रमीचा तो खेळाडू असून धडधाकट शरीरयष्टी चा तरुण होता. कालांतराने परिस्थिती खालावत गेली त्यामुळे त्याने मोलमजुरी तसेच वेटर म्हणून काम करत परिवाराचा गाडा हाकत होता.

Img 20250103 Wa0009

विनोद याने मंगळवारी सायंकाळी निर्गुडा नदीत उडी मारली. ही बाब प्रत्यक्षदर्शींनी चौकातील नागरिकांना सांगितली. पोलिसांना सूचित करण्यात आले, पोलिसांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद यांना कळवून गोताखोर यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले.

गोताखोरांनी मोटार पुलाजवळ शोधले असता विनोद चा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
वणी: बातमीदार