Home वणी परिसर सरपंच कविता सोयाम यांचेवर ‘अविश्‍वास’

सरपंच कविता सोयाम यांचेवर ‘अविश्‍वास’

● सात विरुद्ध दोन मताने ठराव संमत

1806

सात विरुद्ध दोन मताने ठराव संमत

Wani News | तालुक्‍यातील विरकुंड येथे नऊ सदस्‍यीय ग्रामपंचायत आहे. सरपंच यांचे विरोधात असंतोष खदखदत होता. त्यामुळे उपसरपंचासह अन्य सदस्यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35 अन्‍वये तहसिलदार यांचेकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आयोजित विशेष सभेत सात विरुद्ध दोन मताने ठराव संमत करण्यात आला. A complaint was lodged with the Tehsildar under Section 35 of the Mumbai Gram Panchayat Act, 1958.

Img 20250422 wa0027

विरकुंड येथील सरपंच कविता अंबादास सोयाम यांचे विरुध्‍द उपसरपंच मिनू सुनील डांगे, वर्षा प्रमोद मडावी, लता सुहास हिंगाने, सतीश आनंद राजूरकर, अमोल बबन पारखी, चंपत मारोती आत्राम व भुपेंद्र भाऊराव पावडे यांनी अविश्‍वास ठराव मांडत असल्‍याचे सुचना प्रञ तहसिलदार यांना दिले होते.

Img 20250103 Wa0009

सरपंच यांचे विरुध्‍द सदस्‍यांनी अनेक आरोप केले आहेत यात प्रामुख्‍याने अधिकाराचा गैरवापर करणे, मासीक सभा न घेणे, ठरावाची अमलबजावणी न करणे, सदस्यां सोबत गैरव्यवहार करून हिशोब सादर न करणे आदी बाबींचा उहापोह करण्‍यात आला होता. याप्रकरणी तहसिलदार यांनी संपुर्ण खातरजमा व दोन्‍ही बाजुचे मत ऐकुन घेत अविश्‍वास ठराव पारीत केला आहे. यामुळे सरपंच सोयाम यांना पायउतार व्‍हावे लागणार आहे.
Rokhthok News