Home Breaking News वाहतूक शाखेचे संजय आत्राम यांची बदली

वाहतूक शाखेचे संजय आत्राम यांची बदली

● API सीता वाघमारे सांभाळणार वाहतूक शाखा

686

● API सीता वाघमारे सांभाळणार वाहतूक शाखा

Traffic Control wani | पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या नेमणूका करण्यात येत आहे. वाहतूक नियंत्रण उप शाखा,वणी येथे कार्यरत सपोनि संजय आत्राम यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सपोनि सीता वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. API Sanjay Atram has been transferred and API Sita Waghmare has been appointed in Traffic Control Sub Branch, Wani

अस्ताव्यस्त वाहतुकीला शिस्त लागावी याकरिता पोलीस प्रशासनाने वाहतूक उप शाखेचे गठन केले. वणी उपविभागातील वाहतूक व्यवस्था नीट व शिस्तीत व्हावी याकरिता एक अधिकारी व 17 ते 18 कर्मचारी तैनात करण्यात आले. मात्र वाहतुकीला अद्याप शिस्त लावण्यात वाहतूक शाखेला यश आल्याचे दिसत नाही.

वणी उपविभागात कोळसा खाणी व त्यावर आधारित अनेक उद्योग धंदे स्थापित झाले आहे. परिसरात अवजड वाहनातून होणारे दळणवळण, कोळसा खाणीतून उत्खनन झालेला कोळसा रेल्वे सायडिंग तसेच कोलडेपो पर्यंत आणला जातो. भरधाव धावणारी वाहने यामुळे अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यावर वाहतूक शाखेने जरब बसवणे गरजेचे आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी वाहतूक शाखेवर तर आहेच शिवाय नागरिकांवर सुद्धा आहे. शहरातील एकेरी वाहतूक बंद झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था ढेपाळली आहे. धूम स्टाईल बायकर्स वर हवी तशी कारवाई होत नसल्याने ते मुजोर झाले आहे. परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांना कठोर कवायत करावी लागणार आहे.
Rokhthok News