● सोमवारी केलेल्या वक्तव्यामुळे साशंकता
Indurikar maharaj news | निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन 3 नोव्हेंबरला येथील शासकीय मैदानावर करण्यात आले आहे. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असल्याने त्यांनी पाच दिवस कार्यक्रम करणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे कार्यक्रमाबाबत साशंकता असून कीर्तन होणार की नाही याबाबत दिनांक 1 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल. Kirtana of Nivritti Maharaj Indurikar has been organized on November 3.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच धुमसतोय, समाजबांधव प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यातच निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पाच दिवस कोणताच कार्यक्रम करणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. दिनांक 3 नोव्हेंबरला येथील शासकीय मैदानावर होणार असलेल्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
इंदुरीकर महाराज यांचे किर्तन म्हणजे लोटपोट हास्यांचे फवारेच असतात. महिलां, विद्यार्थी तर अबाल वृध्दांपर्यत किर्तनातुन मारण्यात येणारे प्रबोधनात्मक फटकारे त्यांच्या किर्तनाचे वैशिष्ट्य आहे. विनोदातून प्रबोधन हा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचा गाभा असल्याने परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.
गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी आणि रेणुका ईरीगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परंतु इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे आयोजक संभ्रमावस्थेत आहे.
● आम्ही आशावादी आहोत ●
प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तन प्रथमच आपल्या परिसरात होत आहे. महत्प्रयासाने त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले होते. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत असल्याने त्यांनी पाच दिवस कार्यक्रम करणार नसल्याचे जाहीर केले असले तरी दिनांक 1 नोव्हेंबरला ते कार्यक्रमाबाबतची रूपरेषा स्पष्ट करणार आहेत. यामुळे आयोजक नक्कीच आशावादी आहेत.
टीकाराम कोंगरे
माजी अध्यक्ष, जिल्हा बँक
Rokhthok News