Home Breaking News बाजार समिती कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

बाजार समिती कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

● पाच महिन्यापासून वेतन नाही ● तिजोरीत पैसे असताना चालढकल का?

C1 20231109 07520381

पाच महिन्यापासून वेतन नाही
तिजोरीत पैसे असताना चालढकल का?

APMC News Wani | बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन मागील पाच महिन्यापासून थकले आहे. दिवाळी सारखा सण अंधारात जाण्याचे संकेत मिळत आहे. वेतन मिळण्याची आशा धूसर होत असल्याने कर्मचाऱ्यात संताप निर्माण होत आहे. तिजोरीत पैसे असताना वेतन देण्यास होणारी चालढकल बाजार समिती प्रशासनाची दिवाळखोरी उजागर करत आहे. The salaries of the Bazar Committee employees have been arrears for the last five months.

बाजार समितीच्या तिजोरीत खडखडाट असेल तर समजू शकते मात्र ‘सेस’ जमा झालेला असताना चालढकल का? असा प्रश्न कर्मचाऱ्यासमोर उभा ठाकला आहे. तसेच गाळेलीलावातून बाजार समितीच्या तिजोरीत निधी जमा झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाल्याने समितीवर आर्थिक संकट ओढवले होते. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी निधी नसल्याने पाच महिन्यापासुन वेतन थांबविण्यात आले होते. गणेश चतुर्थीच्या काळात थोडोफार अग्रीम देऊन कर्मचाऱ्यांचे समाधान करण्यात आले होते. त्यावेळी बाजार समितीचे उत्पन्नच नसल्याने कर्मचारीही शांत होते.

Img 20250103 Wa0009

सध्यस्थितीत गाळेलीलावातून व धान्याच्या सेसपासून बाजार समितीच्या तिजोरीत निधी जमा झाला आहे. तरीही प्रशासन कर्मचाऱ्यांची दीवाळी साजरी करण्यास मागेपुढे का पाहत आहे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. कायम कर्मचाऱ्यासह रोजंदारी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बाजार समितीतील कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा दिवाळी बोनससुद्धा देण्यात येणार नसल्याने कर्मचाऱ्यात असंतोष दिसून येत आहे. दिवाळी चार दिवसावर आली आहे. त्यातच बाजार समितीचे सचिव तीन दिवस रजेवर गेल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याची अनिश्चितता आहे यामुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होणार आहे.
Rokhthok News