Home Breaking News WCL : मोबदला द्या अन्‍यथा ‘खळ्ळ…खट्याक’

WCL : मोबदला द्या अन्‍यथा ‘खळ्ळ…खट्याक’

● वेकोलीची मनमानी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ● मनसेने दिला आठ दिवसाचा अल्‍टीमेटम

1011
C1 20231109 11160362
वेकोलीची मनमानी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
मनसेने दिला आठ दिवसाचा अल्‍टीमेटम

MNS NEWS WANI | वेकोलीव्‍दारा अवजड वाहनांतुन होत असलेल्‍या दळणवळणामुळे रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेल्‍या शेतजमीनी बाधीत होत आहे. उत्‍पादन क्षमता कमालीची घटली आहे. पिडीत शेतकऱ्यांनी मनसेचे नेते राजु उंबरकर यांना साकडे घातले. याप्रकरणी मनसेने प्रशासनाला निवेदन देत आठ दिवसाचा अल्‍टीमेटम दिला. अन्‍यथा ‘खळ्ळ…खट्याक’ करण्‍यात येईल असा ईशारा देण्‍यात आला आहे. MNS gave a statement to the administration and gave an ultimatum of eight days.

Img 20250619 wa0016

तालुक्यातील येनाडी, येनक, शिवनी, कोलगाव, शेवाळा या गावातील शेतकरी वेकोलीच्‍या बेजबादारपणामुळे कमालीचे ञस्‍त झाले आहे. शेकडो वाहनांच्‍या माध्‍यमातुन कोळशाची होणारी वाहतुक आणि वातावरणात पसरणारी धुळ ही रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेल्‍या शेतपिकांवर साचत आहे. यामुळे उत्‍पादन क्षमताच नष्‍ट झाली आहे. पांढरे सोने पिकवणारा शेतकरी काळवंडला आहे. जमिनीचा पोत नाहीसा होतांना दिसत आहे तर हाती येणारी पिके उध्वस्त झाली आहे.

Img 20250103 Wa0009

शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिनांक 1 नोव्‍हेंबरला आंदोलनात्‍मक पाविञा घेतला होता. झालेल्या नुकसानाची भरपाई वेकोली प्रशासनाकडून मिळवून देऊ असे आश्वासन वेकोलीच्या अधिकाऱ्याने लेखी दिले होते. याप्रसंगी तहसीलदार निखील धुळधर यांनी मध्यस्थी करत पाच दिवसांत नुकसान भरपाई दिल्‍या जाईल असे आश्‍वासीत केले माञ अदयाप कोणताही मोबदला न मिळाल्‍याने पिडीत शेतकऱ्यांनी मनसेचा दरवाजा ठोठावला आहे.

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांचे आदेशाने तालुका प्रमुख फाल्‍गुन गोहोकार व महाराष्‍ट्र सैनिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत पिडीत शेतकऱ्यांना वेकोली प्रशासनाने तात्‍काळ नुकसान भरपाई दयावी अशी मागणी निवेदनातुन केली आहे. आठ दिवसांच्‍या आत मोबदला दिला नाही तर मनसे खळ्ळ…खट्याक आंदोलन करेल असा ईशारा सुध्‍दा देण्‍यात आला आहे.
Rokhthok News