Home Breaking News बलिकेवर अत्याचार, आरोपी अटकेत

बलिकेवर अत्याचार, आरोपी अटकेत

● पोटात अंकुराची वाढ आणि थेट पोलिसात धाव

C1 20250508 18045244
पोटात अंकुराची वाढ आणि थेट पोलिसात धाव

Crime News | पाच महिन्यांपूर्वी अल्पवयीन बालिका नातेवाईकांकडे पायदळ जात होती. त्याचवेळी 22 वर्षीय दुचाकीस्वाराने तिला राज्य महामार्गाच्या कडेला झूडपात नेत कुकर्म केले. कालांतराने पिडीतीच्या पोटात अंकुराची वाढ होत असल्याचे दिसून येताच थेट पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. They took him to a bush on the side of the state highway and committed a crime.

सविस्तर वृत्त असे की, मागील डिसेंबर महिन्यामध्ये पिडीत अल्पवयीन मुलीचे आईवडील बाहेरगावी गेले होते. पिडीता एकटीच घरी थांबण्यापेक्षा गावातच असलेल्या नातेवाईकाकडे पायदळ निघाली होती. त्याचवेळी संशायित आरोपी वैभव राजूरकर (22) दुचाकीने जात होता. त्याने बलिकेला गावी सोडण्याचा आग्रही बहाणा करत तिला राज्यमहार्गावर एका बिअर बार मागे असलेल्या झूडपात नेले.

IMG 20260511 WA0005

नराधम तरुणाने बलिकेवर बळजबरीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशातच पिडीता हीच्या पोटात दिवसागणिक अंकुराची वाढ होत असल्याने पीडिता व तिच्या कुटुंबीयांनी मारेगाव पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याचेवर अत्याचार, अँट्रॅसिटी अँक्ट व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009