Home Breaking News कार्यकर्ता मेळाव्‍यात मुनगंटीवार यांची फटकेबाजी

कार्यकर्ता मेळाव्‍यात मुनगंटीवार यांची फटकेबाजी

● पञपरिषदेत कॉग्रेस पक्षावर "रोखठोक" प्रहार

C1 20240321 17035135

पञपरिषदेत कॉग्रेस पक्षावर “रोखठोक” प्रहार

सुनील पाटील, वणी : भारतीय जनता पार्टीने चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभेच्‍या सार्वञीक निवडणुकीकरीता वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल केली. उमेदवारी प्राप्‍त होताच प्रचाराचा झंझावात सुरु करण्‍यात आला आहे. येथील विनायक मंगल कार्यालयात गुरुवारी मतदारसंघातील कार्यकर्त्‍यांचा मेळावा आयोजित करण्‍यात आला होता. यावेळी त्‍यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली तर पञपरिषदेत कॉग्रेस पक्षांच्‍या कार्यप्रणालीवर “रोखठोक” प्रहार केला. Nomination of Sudhir Mungantiwar for Lok Sabha General Elections

चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभा मतदार संघात भाजपाने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. विकासात्‍मक दृष्‍टी असलेला, हुशार – अभ्‍यासु व वक्‍तृत्‍वात निपून असल्‍याने मतदारांना मुनगंटीवार यांचे व्‍यक्‍तीमत्‍व भावणार आहे. तर विरोधकांना मुनगंटीवार यांच्‍या तोडीचा उमेदवार अद्याप गवसला नाही. कॉग्रेस पक्षाजवळ “प्रतिभा”वंत उमेदवार असतांना लोकसभा निवडणुकीत “विजय” मिळविण्‍याची रणनिती तर आखण्‍यात येत नाही ना हा संशोधनाचा विषय आहे.

आयोजीत कार्यकर्ता मेळाव्‍यात वणी मतदार संघातील कार्यकर्त्‍यांची प्रचंड गर्दी जमली होती. व्‍यासपिठावर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. मदन येरावार, आ. प्रा. अशोक उईके, जिल्‍हाध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकसभा विस्‍तारक रवी बेलुरकर, दिनकर पावडे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्‍यांना विविधांगी मार्गदर्शन केले. “अब की बार चार सौ पार” करत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला. तर विरोधकांच्‍या कार्यप्रणालीवर फटकारे ओढले.

Img 20250103 Wa0009

50 वर्षाची घाण तिसऱ्यांदा धुतोय….!
पञपरिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी कॉग्रेस पक्षाच्‍या कार्यप्रणालीवर “रोखठोक” प्रहार केला. शेतकरी आत्‍महत्‍या यापुर्वी सुध्‍दा झालेल्‍या आहेत. कृषीमंञी शरद पवार असतांना ही आत्‍महत्‍या झालेल्‍या आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्‍महत्‍या थांबाव्‍या याकरीता प्रयत्‍न करताहेत. माञ कॉग्रेसी नेत्‍यांनी सांगाव तुम्‍ही पन्नास वर्षात काय केले. ही पन्‍नास वर्षाची घाण आहे याला चार पाच वेळा धुवावे लागेल आम्‍ही तिसऱ्यांदा धुतोय असे मुनगंटीवार यांनी स्‍पष्‍ट केले.
Rokhthok News