● पक्षश्रेष्ठींने दिला ग्रीन सिग्नल !
सुनील पाटील, वणी : चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभा निवडणुकी करीता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल या बाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पुञी शिवानी ला उमेदवारी मिळावी याकरीता चांगलाच दबावतंत्राचा वापर केला होता. माञ पक्षश्रेष्ठींनी दोघांची बाजु ऐकुन घेत प्रतिभा धानोरकर ह्याच काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार असतील असे स्पष्ट केल्याची चर्चा आहे. Pratibha Dhanorkar candidate for Chandrapur-Wani-Arni Lok Sabha election.
चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभेच्या सार्वञीक निवडणुकी करीता भारतीय जनता पक्षाने वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांचे नांव पहिल्या यादीतच जाहिर केले होते. तर महाविकास आघाडीतील कॉग्रेस पक्षाच्या वाटेला आलेल्या या मतदारसंघात कॉग्रेसचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होत नव्हते. प्रतिभा धानोरकर यांचे सोबतच विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार व सुभाष धोटे यांच्या नावाची चाचपणी सुध्दा करण्यात येत होती.
दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी केलेले “व्टिट” समाज माध्यमात चांगलेच व्हायरल झाले होते. यात त्यांनी कार्यकर्त्यांना भावनात्मक आवाहन केले होते. “दिवंगत खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पश्चात सर्वांनी अतिशय धीराने आणि धैर्यान चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचारांची आणि विधायक कार्याची पताका धरून ठेवली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याच धीराने आणि धैर्याने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. काळ फिरत राहतो, थांबणे हा त्याचा धर्म नाही ! असे नमुद केले होते.
तसेच मागील लोकसभा निवडणुकीत अगदी निवडणुका तोंडावर असताना बाळू धानोरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली होती, आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी गाजवलेले रणमैदान निकालाच्या रुपाने सगळ्या जगाने पाहिले होते. आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपणा सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं असल्याचा संदेश दिला होता.
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. यात राज्यात दोन महिलांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलल्या जात आहे. सोलापुर येथुन प्रणिती शिंदे तर चंद्रपुर येथून प्रतिभा बाळु धानोरकर यांचा समावेश असेल असे सध्यातरी दिसत आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीने निवडणुक रनसंग्रामात चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.
Rokhthok News






