Home Breaking News आणि… शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी मुंबईत

आणि… शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी मुंबईत

● मविआतील जागा वाटपात "ट्विस्ट" ● कोणाच्या पारड्यात पडेल मतदारसंघ

842
C1 20241007 08101861

मविआतील जागा वाटपात “ट्विस्ट”
कोणाच्या पारड्यात पडेल मतदारसंघ

Political News | जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी किमान चार जागा मिळाव्यात याकरिता शिवसेना (उबाठा) आग्रही आहेत. यात वणी, दारव्हा- दिग्रस, यवतमाळ व उमरखेड चा समावेश असल्याची विश्वसनीय माहिती आहे. महाविकास आघाडीत वणी मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला असून दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. दारव्हा-दिग्रस हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास वणी मतदारसंघ शिवसेना (उबाठा)ला सुटेल अशी चर्चा रंगत आहे. Confusion as to whose share the constituency will go to in Mahavikas Aghadi

Img 20250422 wa0027

महाविकास आघाडीच्या घटक पक्षात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून तब्बल 16 उमेदवार इच्छुक आहेत तर शिवसेना (उबाठा) कडून पाच उमेदवारांनी बाशिंग बांधले आहे. वणी मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी मिळावी अशी सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे. मात्र अनेकदा मतदारांच्या सामोरे गेल्यावरही मतदारांनी नाकारले ही स्थिती लक्षात न घेता उमेदवारीवर होत असलेला आग्रह पक्षश्रेष्ठींना कळू नये हाच खरा संशोधनाचा विषय आहे.

Img 20250103 Wa0009

वणी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये माविआच्या उमेदवाराला मिळालेला घसघशीत प्रतिसाद अनेकांना आमदारकीचे डोहाळे लावणारा आहे. मतदारसंघात बलाढ्य असलेल्या भाजप किंवा त्यांच्या संघटना बांधणी बाबत कोणताही संभाव्य उमेदवार लक्ष देताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरण व सत्ताधाऱ्यांबाबतचा रोष निर्णायक ठरला. विधानसभेतील मुद्दे व रणनीती वेगळी असणार आहे.

चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा निवडणुकीत वणी मतदारसंघात भाजप उमेदवाराला 69 हजार 133 मते मिळाली. आणि ते महायुतीचे मतदान होते ही बाब विरोधकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला 67 हजार 170 एवढे मतदान मिळाले होते. म्हणजेच भाजपच्या मतदानात दोन हजाराची वाढ झाली आहे.

वणी विधानसभा काँग्रेसच्या वाट्याला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जागा वाटप व उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. निवडून येण्याची क्षमता तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सहकार्य लाभणाऱ्यालाच उमेदवारी मिळेल असे बोलल्या जात आहे.
Rokhthok News