● मुकुटबन पोलिसांची कारवाई
Crime News | पिल्कीवाढोना शेत शिवारातील जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती प्राप्त होताच मुकुटबन पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून चार कोंबडे व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. Raid on the kombad bazar, three arrested

विकास देवाजी राउत (35), गजानन फकरु चाटारे (35) हे दोघे राहणार चिचघाट ता. झरी व देवानंद
मारोती जगनाडे (36) रा. साखरा ता. वणी या तिघांना ताब्यात घेण्यात आले. उप विभागात कोंबड बाजाराचा विळखा वाढताना दिसत आहे. जंगल सदृश्य भागात लपूनछपून कोंबड्याच्या झुंजी लावून हरजितचा जुगार खेळल्या जात आहे.
रविवारी दुपारी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खाजगी वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. जंगलात कोंबड्याच्या झुंजी लावून हरजितचा जुगार खेळल्या जात होता. पोलिसांची चाहुल लागताच कोबड बाजार खेळणारे पळून गेले. या कारवाईत तिघांना ताब्यात घेत चार कोंबडे, दोन धारदार काती असा 6 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई मुकुटबन पोलिसांनी केली.
Rokhthok News