Home Breaking News LCB ने केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश

LCB ने केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश

● गोवंशाची सुटका, 44 लाखाचा मुद्देमाल जप्त ● ट्रक थांबताच आरोपीचे पलायन

923
C1 20250123 15202831

गोवंशाची सुटका, 44 लाखाचा मुद्देमाल जप्त
ट्रक थांबताच आरोपीचे पलायन

Crime News | स्थानीक गुन्हे शाखा सातत्याने दणदणीत कारवाया करताना दिसत आहे. गोवंश तस्करीचा बिमोड करण्यासाठी सरसावले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने गोवंश तस्करीचा पर्दाफाश करत 56 गोवंशाची सुटका करत तब्बल 43 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. LCB exposes beef smuggling…

Img 20250422 wa0027

मंगळवारी दुपारी यवतमाळ जिल्हा स्थानीक गुन्हे शाखेचे PSI धनराज हाके व पोहेकॉ उल्हास कुरकूटे हे पांढरकवडा हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्याच दरम्यान गोपनीय सूत्राने टीप दिली की, नागपूर वरून हैद्राबाद ला ट्रक क्रमांक MH-29- BE-4345 मधून गोवंशाची कत्तली करिता तस्करी होत आहे. गोपनीय माहितीच्या आधारे LCB पथकाने वाराकवठा गावाजवळ महामार्गावर सापळा रचला.

Img 20250103 Wa0009

पांढरकवडा कडुन हैद्राबाद कडे जाणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवून असतानाच एक ट्रक ज्याचे समोरील दोन्ही काच फुटलेले असून भरधाव वेगाने पाटणबोरी कडे येत असल्याची माहिती मिळाली. अवघ्या काही वेळातच संशयित ट्रक दिसून आला. ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने महामार्गावर ट्रक थांबवला व चालकासह दोघांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते गवसले नाही.

स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकांनी ट्रक ची झाडाझडती घेतली असता त्यात दोन कप्पे करण्यात आले होते. त्यात निर्दयपणे गोवंशीय जनावरे पायाला व गळ्याला दोरीने बांधून असल्याचे दिसून आले. कोंबून बांधलेल्या 56 गोवंशाची सुटका करण्यात आली. त्या गोवंशाला सुरक्षा व चारापाणीच्या दृष्टीने रासा येथील गोरक्षण संस्थानात ठेवण्यात आले. तर 13 लाख 60 हजार रुपयांचे गोवंश व 30 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 43 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo रामेश्वर वेंजने, पोलीस निरीक्षक Lcb सतीश चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI धनराज हाके, HC उल्हास कुरकुटे, NPC निलेश निमकर, स्थानीक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलीस स्टेशन पांढरकवडा यांनी केली.
Rokhthok News