Home Breaking News Poison : युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

Poison : युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

● परिवाराचा आधार हरपला

1540
C1 20250211 15192018

परिवाराचा आधार हरपला

Sad News | मारेगाव तालुक्यातील केगाव येथे 35 वर्षीय युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना मंगळवारला सकाळी 9 वाजता उघडकीस आली. The farmer ended his life by consuming poison in his own field.

Img 20250422 wa0027

पवन आण्याजी पिंपळशेडे (35) असे मृतकाचे नाव आहे. तो मारेगाव तालुक्यातील केगाव येथे वास्तव्यास होता. आपल्या तीन एकर शेत जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांचेवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता.

Img 20250103 Wa0009

घटनेच्या दिवशी तो सकाळी आपल्या शेतात गेला. तेथे त्याने विषारी कीटकनाशक प्राशन केले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही बाब प्रत्यक्षदर्शीला दिसताच त्यांनी याप्रकरणी घरच्या मंडळींना कळवली. तसेच पोलिसांना कळविण्यात आले. युवा शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पश्चात आई, पत्नी व पाच वर्षाचा मुलगा आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करताहेत.
Rokhthok News