Home Breaking News accident : दुचाकीचा चुराडा, सुदैवाने दोघांचा जीव वाचला

accident : दुचाकीचा चुराडा, सुदैवाने दोघांचा जीव वाचला

● कोलवॉशरी प्रशासनाला धरले धारेवर ● अपघात ग्रस्त रुग्णांना मिळाली मदत

C1 20250301 18394616

कोलवॉशरी प्रशासनाला धरले धारेवर
अपघात ग्रस्त रुग्णांना मिळाली मदत

accident news | ब्राम्‍हणी येथे वास्‍तव्‍यास असलेले दोघे व्‍यक्‍ती वणी येथील कामे आटोपुन गावी परतत असतांना भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला असुन सुदैवाने दोघांचा जीव वाचला. या अपघातात एकाचा पाय तर दुसऱ्याच्या हाताला गंभीर इजा झाली. ही घटना शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता घडली. The truck hit the bike. The bike was crushed in this accident

महादेव उपरे (45) व महादेव मंगाम (55) अशी अपघातग्रस्‍तांची नावे आहेत. ते ब्राम्‍हणी येथील निवासी असुन वणी येथे कामानिमित्‍त आले होते. काम आटोपुन दुचाकी क्रमांक MH 29 AE 3906 ने गावी परतत असतांना हायवा ट्रक क्रमांक MH 40 CM 5159 ने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोघांना गंभीर स्‍वरुपाचा मार लागला आहे. त्‍यांना तातडीने येथील खाजगी रुग्‍णांलयात दाखल करण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांना चंद्रपुर येथे पुढील उपचारासाठी हलविण्‍यात आले आहे.

“देव तारी त्‍यास कोण मारी” या उक्ती प्रमाणे हायवा ट्रकच्‍या मधोमध दुचाकी धडकली, दुचाकीचा चुराडा झाला माञ दोघेही थोडक्‍यात बचावले. घडलेली घटना युवासेनेचे अजिंक्‍य शेंडे यांना कळताच त्‍यांनी थेट अपघातग्रस्‍तांची भेट घेतली. हायवा ट्रकचा मालक रूग्णांना उपचारार्थ मदत देण्यास टाळाटाळ करत असल्‍याचे कळताच शेंडे यांनी कार्यकर्त्‍यांसह कोलवॉशरी गाठली.

Img 20250103 Wa0009

कोलवॉशरी प्रशासनाला अपघातग्रस्तांची आर्थिक परिस्थिती समजून सांगत चांगलेच धारेवर धरले व त्यांना आर्थिक मदत करण्यास भाग पाडले. यावेळी योगेश उपरे, यश खामणकर,  रुपेश उपरे, सुजित काळे, रमेश डाखरे, अक्षय आवारी, प्रीतम राजगडे, नागेश काकडे,  हनुमान आवारी, गणेश काळे, विवेक राजगडे, बीटा राजगडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Rokhthok News

Previous articleNabhik Samaj : वधू वर परिचय मेळावा 1 मार्चला
Next articleSuicide by hanging : गळफास लावून संपवले आयुष्य
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.