Home Breaking News अरुण बिलोरिया यांचे निधन

अरुण बिलोरिया यांचे निधन

● येथील यशस्वी उद्योजक हरपला

1245
C1 20250304 09185746

येथील यशस्वी उद्योजक हरपला

Sad News | येथील यशस्वी उद्योजक अरुण बिलोरिया यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 58 वर्षाचे होते. त्यांचेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री 11:30 त्यांची प्राणज्योत मालवली. Successful entrepreneur Arun Biloria passed away after a short illness

Img 20250422 wa0027

अरुण बिलोरिया (58) हे यशस्वी उद्योजक होते, रवी नगर मध्ये त्यांचे वास्तव्य होते. काही दिवसांपासून ते आजारी असल्याने नागपूर येथील रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

Img 20250103 Wa0009

अरुण बिलोरिया हे हसतमुख स्वभावाचे होते, समाजात त्यांची चांगली प्रतिमा होती. त्यांच्या अकस्मात जाण्याने बिलोरिया परिवार व मित्रमंडळी वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा दर्शन, मुलगी वैष्णवी व फार मोठा आप्त परिवार व मित्रपरिवार आहे राजाभाऊ बिलोरिया हे त्यांचे मोठे बंधू आहेत.

अरुण बिलोरिया यांचेवर मंगळवार दिनांक 4 मार्चला दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान रवी नगर येथून निघणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)