Home Breaking News Accident on Samriddhi Highway : यवतमाळ जिल्ह्यातील दोन ठार, तीन महिला गंभीर

Accident on Samriddhi Highway : यवतमाळ जिल्ह्यातील दोन ठार, तीन महिला गंभीर

● साई दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

1890
C1 20250308 17124145
साई दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

Sad News | बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथील भाविक शनिवारी सकाळी क्रूजर वाहनाने साई दर्शनासाठी निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना बुलढाणा जिल्ह्याच्या शिंदखेड राजा तालुक्यातील माळसावरगाव हद्दीत टायर फुटल्याने क्रूझर पलटी झाली आणि त्याचवेळी दुसऱ्या वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात Accident on Samriddhi Highway दोघे घटनास्थळीच ठार झाले तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून अन्य भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. Accident on Samriddhi Highway Two were killed on the spot while three women were seriously injured

Img 20250422 wa0027

विद्याबाई साबळे (55) व मोतीराम बोरकर (60) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर प्रतिभा अरुण वाघोडे (45), मीराबाई गोटफोडे (65) व भावना रमेश राऊत (30) ह्या तिघीजणी गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना तातडीने उपचारार्थ जालना येथे हलविण्यात आले आहे. तर क्रूझर चालक संतोष साखरकर (28), कमलाबाई जाधव (55), सुशीला जाणार (52), मिराबाई राऊत (60), छायाबाई चव्हाण (65), प्रमिला घाटोळ (60), भक्ती राऊत (5), रमेश राऊत (40), बेबीबाई येलोत (60), मोतीराम बोरकर (65) सर्व रा आसेगाव देवी तालुका बाभूळगाव हे भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.

Img 20250103 Wa0009

आसेगाव देवी येथून पंधरा भाविक भक्त साई दर्शनासाठी क्रूझर क्रमांक MH-25-R-3579 ने शिर्डी येथे समृद्धी महामार्गावरून जात होते. बुलढाणा जिल्ह्याच्या शिंदखेड राजा तालुक्यातील माळसावरगाव हद्दीत क्रूझरचा डाव्या बाजूचा मागील टायर फुटला. वाहन अनियंत्रित झाले आणि महामार्गावर पलटी झाले. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या क्रेटा कार क्रमांक MH-29-CB-9630 चे चालक हर्षल देवानंद भाग्यवंत (28) रा यवतमाळ यांना पलटी झालेल्या कुझरचा अंदाज न आल्याने जबर धडक दिली. या अपघातात क्रूझर मधील दोघे भाविक ठार झाले तर तिघी गंभीर जखमी झालेल्या आहेत. मात्र क्रेटा वाहनातील कोणालाही इजा झाली नाही.
Rokhthok News

Previous articleअरुण बिलोरिया यांचे निधन
Next articleभीषण अपघात एक महिला ठार, दोन गंभीर
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.