Home Breaking News इंजिनिअर तरुणीने मृत्यूला कवटाळले

इंजिनिअर तरुणीने मृत्यूला कवटाळले

● लग्न मोडल्याच्या नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल...!

C1 20250508 16485775

लग्न मोडल्याच्या नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल…!

Sad News : मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये राहणाऱ्या एका उच्चशिक्षित अभियांत्रिकी पदवीधर तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. Young engineer hangs herself at her residence

दिक्षा केशव उमरे (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या नोकरीत स्थिर झालेल्या दिक्षाचे यावर्षी लग्न ठरले होते. मात्र काही कारणास्तव हे लग्न मोडल्यामुळे ती मानसिक नैराश्यात होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

नैराश्यातून तिने बुधवारी रात्री ओढणीच्या सहाय्याने बेडरूममधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी दरवाजा उघडत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी दरवाजा तोडून पाहिले असता ही धक्कादायक बाब समोर आली.

Img 20250103 Wa0009

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून नेमकं आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दिक्षाच्या पश्चात तिची आई, सेवानिवृत्त वडील, धाकटी बहीण आणि मोठा आप्तपरिवार आहे. तिच्या अकस्मात जाण्याने मारेगाव शहरात शोककळा पसरली आहे.
Rokhthok News