Home Breaking News वसंत जिनिंगचे माजी उपाध्यक्ष कृष्णाजी वरारकर यांचे निधन

वसंत जिनिंगचे माजी उपाध्यक्ष कृष्णाजी वरारकर यांचे निधन

● रविवारी 10 वाजता होणार अंत्यसंस्कार

C1 20250504 08232900

रविवारी 10 वाजता होणार अंत्यसंस्कार

Sad News | येथील प्रतिष्ठित नागरिक, वसंत जिनिंगचे माजी उपाध्यक्ष कृष्णाजी नानाजी वरारकर (76)रा. टाकळी (चिखली) यांचे शनिवार दिनांक 3 में राजी दुपारी 1:30 वाजता दुःखद निधन झाले. Former Vice President of Vasant Jining Krishnaji Vararkar passes away

कृष्णाजी वरारकर यांना मागील दिड वर्षांपूर्वी कर्करोगाने ग्रासले होते. तब्बल दिड वर्ष त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. शनिवारी त्यांचे दुःखद निधन झाले. ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते तसेच आ. संजय देरकर यांचे निकटस्थ म्हणून त्यांना ओळखल्या जात होते. त्यांच्या मृत्यूने वरारकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

रविवार दिनांक 4 मे रोजी 10 वाजता त्यांचेवर मोक्षधाम वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)