Home Breaking News शिवसेनेच्या “खमक्या” शिलेदारावर प्रमुखपदाची जबाबदारी

शिवसेनेच्या “खमक्या” शिलेदारावर प्रमुखपदाची जबाबदारी

● पक्ष बांधणीसाठी मंत्री संजय राठोड सरसावले

C1 20250623 18382431

पक्ष बांधणीसाठी मंत्री संजय राठोड सरसावले

Political News :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेता पालकमंत्री संजय राठोड आक्रमक नीतीचा अवलंब करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात दोन संपर्क प्रमुख तर तीन जिल्हा प्रमुखांवर संघटना बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Shiv Sena’s “khamkya” shiv sainik takes on the responsibility of a top post

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अधिकृतपणे विविध पदांची जबाबदारी सोपवल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख पदावर दोघांची वर्णी लागली असून हरिहर लिंगनवार यांच्याकडे वणी, राळेगाव, यवतमाळ, आर्णी तर श्रीधर मोहोड यांचेवर दिग्रस, पुसद व उमरखेड या विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यावर चंद्रपूर- यवतमाळ लोकसभेचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

Img 20250103 Wa0009

यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत व्हावी याकरिता पालकमंत्री संजय राठोड विशेषत्वाने लक्ष देत आहे. जिल्ह्यात तीन जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. गजानन डोमाळे यांचेकडे यवतमाळ व राळेगाव, राजुदास जाधव आर्णी व वणी तर यशवंत पवार यांचेकडे दिग्रस, पुसद व उमरखेड विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कटिबद्ध असावे असे नियुक्ती पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. जनतेच्या हितासाठी कार्यरत असलेल्या शिवसेनेची यवतमाळ जिल्ह्यात पक्षबांधणी अधिक बळकट व्हावी याकरिता “खमक्या” शिलेदारावर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.
Rokhthok News