● बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार
निधन वार्ता : नांदेपेरा येथील ज्येष्ठ नागरिक चंदनलालजी मंगलप्रसाद जयस्वाल (83) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचेवर नांदेपेरा येथे बुधवार दिनांक 15 एप्रिल ला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे. Chandan Lalji Jaiswal passes away
चंदनलालजी जयस्वाल हे मितभाषी होते, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे, साधे व मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा मोठा मित्र परिवार व गोतावळा परिसरात आहे. ते सुरेशलालजी मंगलप्रसाद जयस्वाल यांचे मोठे बंधू, नरेंद्र चंदनलालजी जयस्वाल यांचे वडील तर कुलदीप जयस्वाल यांचे मोठे बाबा होते. तीन मुली व नातवंडांसह मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)





