● दुर्दैवी घटनेने पसरली शोककळा
Sad News : तालुक्यातील लाठी (बेसा) येथील रहिवासी कवडू पांडुरंग खोके (40) यांनी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी उघडकीस आली. Man commits suicide by hanging
प्राप्त माहितीनुसार, कवडू खोके हे पहाटे अंदाजे 4 ते 5 वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात गेले असता त्यांनी झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. काही वेळानंतर ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शिरपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, वणी येथे पाठवण्यात आला. दरम्यान, कवडू खोके यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिरपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Rokhthok






