Home Breaking News ‘करिअर कट्टा’ जिल्हा समन्वयक डॉ. रोहित वनकर

‘करिअर कट्टा’ जिल्हा समन्वयक डॉ. रोहित वनकर

● यशवंत शितोळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.....

C1 20260415

यशवंत शितोळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली…..

WANI NEWS : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून येथील नूरजहाँ बेगम सलाम अहमद आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित सुधाकर वनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘Career Katta’ District Coordinator Dr. Rohit Vankar

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये ‘करिअर कट्टा’ उपक्रम प्रभावीपणे व यशस्वीरित्या राबविण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या नियुक्तीबद्दल डॉ. वनकर यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, संस्थेचे सचिव डॉ. राणानूर सिद्धिकी, प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, ऍड. निलेश चौधरी, डॉ. दिनेश खेडकर तसेच डॉ. प्रवीण कुलकर्णी यांचे आभार मानले आहेत.
Rokhthok

Img 20250103 Wa0009
Previous articleचंदनलालजी जयस्वाल यांचे निधन
Next articleगळफास घेऊन इसमाची आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.