Home Breaking News आणि, वेकोली कामगारा समोरच ‘वाघ’

आणि, वेकोली कामगारा समोरच ‘वाघ’

● कोलगाव-साखरा परिसरातील थरारक घटना

C1 20260415
कोलगाव-साखरा परिसरातील थरारक घटना

Big News : बुधवारी सकाळी कोलगाव- साखरा परिसरातील वेकोलीच्या डम्पिंग क्षेत्रात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार पाहायला मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास कामावर गेलेल्या वेकोली कामगारांना अचानक वाघाचे दर्शन झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. Oh my god… ‘Tiger’ in front of WCL workers

प्राप्त माहितीनुसार, कोलगाव (साखरा) परिसरातील वेकोलीमार्फत सुरू असलेल्या डम्पिंग क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांची हालचाल वाढल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान आज सकाळी प्रत्यक्ष पट्टेदार वाघ दिसल्याने कामगार व शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.

दरम्यान, वाघ दिसताच एका सतर्क कामगाराने मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ कैद केला असून हा व्हिडीओ सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. वाघाचे वास्तव्य याच परिसरात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Img 20250103 Wa0009

कोलगाव साखरा परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने कामगार तसेच परिसरातील शेतकरी-शेतमजूर प्रचंड धास्तावले आहे. या वाघांच्या मुक्तसंचारामुळे पशुधन, मानव जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने परिसरातील शेतकरी व कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करावी असे बोलल्या जात आहे.
ROKHTHOK