Home Breaking News सामाजिक बांधिलकी जपणारा लोकनेता

सामाजिक बांधिलकी जपणारा लोकनेता

● वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मेजवानी.....

C1 20260522

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांची मेजवानी…..

ROKHTHOK : समाजकारण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे लोकनेता संजय खाडे यांचा वाढदिवस यंदा सेवाभावी आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक 23 मे रोजी वणी येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान, वृद्धाश्रमात साहित्य वाटप, रुग्णांना फळवाटप तसेच नवीन व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. A leader who upholds social commitment

सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अपघात, शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांच्या उपचारासाठी रक्ताची सतत आवश्यकता भासत असताना, एका रक्तदात्यामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते, या मानवतेच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. आपल्या आयुष्याचा मोठा काळ समाजासाठी वेचलेल्या वृद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचवेळी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येणार आहेत.

Img 20250103 Wa0009

संध्याकाळी 6 वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शहरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत. संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे यांच्या नेतृत्वात सुरू होत असलेल्या या नव्या व्यावसायिक उपक्रमामुळे रोजगार व विकासाभिमुख कामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत. वाढदिवसानिमित्त होत असलेल्या या सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असून, “वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर समाजाप्रती कर्तव्य निभावण्याची संधी” असा आदर्श या निमित्ताने निर्माण होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.