● 75 वा स्वतंत्र अमृत मोहोत्सव निमित्य 75 जेष्ठ नागरिकाचा सत्कार
रोखठोक :– युवा नेते जनसेवक मंगेश पाचभाई हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात, त्यांच्या कामाचे कौतुक नेहमीच झरी जामणी तालुक्यात होत रहाते, अनेक सामाजीक उपक्रम मंगेश पाचभाई मीत्र परीवारा मार्फत घेत रहातात.

दि.6 डीसेंबरला युवा नेते मंगेश पाचभाई यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले सोबतच 75 वा अमृत महोत्सवा निमित्याने समाजात वावरणारे ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला.
मंगेश पाचभाई यांच्या वाढदिवसा निमित्याने अडेगाव येथील हनुमान मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता सरपंच सीमा लालसरे, सरपंच विशाल ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे मोरेश्वर सरोदे, जीवन उलमाले, संतोष पारकी, वंदना पेटकर, संजय आत्राम, अनिल कडू, कोसऱ्याचे मंगेश अस्वले, जयेश बुच्चे, दिगंबर पाचभाई, विजू लालसरे, राहुल ठाकूर, दिनेश जीवतोडे, विवेक पुरके, गणेश पेटकर सह नागरिक व मंगेश पाचभाई मीत्रपरीवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार