Home Breaking News त्या..बंडखोरांविरोधात शिवसैनिक ‘आक्रमक’

त्या..बंडखोरांविरोधात शिवसैनिक ‘आक्रमक’

● संजय राठोड विरोधात शाब्दिक आगपाखड

वणी: राज्यातील शिवसेनेत प्रमुख असलेल्या नेते, खासदार, आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. जिल्ह्यातील माजी मंत्री संजय राठोड यांनी सुद्धा बंडखोरी केली यामुळे शिवसैनिकात कमालीचा संताप व्यक्त होत आहे. बंडखोरांच्या विरोधात जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात संतप्त शब्दात निदर्शने करण्यात आली.

मंगळवार दि. 28 जूनला दुपारी हजारो शिवसैनिकांसह येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सुनील कातकडे, संजय देरकर, संजय निखाडे, दीपक कोकास, शरद ठाकरे, गणपत लेडांगे, संजय आवारी, विक्रांत चचडा, महेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी महिला आघाडी संघटिका उपस्थित होते.

निदर्शन आंदोलनात बोलतांना विश्वास नादेकरांनी घणाघाती शाब्दिक फटके बंडखोरांना लागवले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या बंडखोरांसाठी काय केले नाही. मानसन्मान दिला, मोठमोठी पदे बहाल केली. आणि त्याच पक्षाविरोधात एका महाशक्तीच्या साथीने बंडखोरी केली हे शिवसैनिक कधीच खपवून घेतली जाणार नाही असे परखड मत नांदेकरांनी व्यक्त केले.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009
Previous articleबंडखोरांविरोधात शिवसैनिक ‘आक्रमक’
Next articleदुचाकीचा अपघात, दोन तरुण गंभीर जखमी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.