Home Breaking News भाविकांची परवड, प्रशासन गाढ झोपेत !

भाविकांची परवड, प्रशासन गाढ झोपेत !

● बाबापूर रस्त्याची दयनीय अवस्था

C1 20250802 12354806

बाबापूर रस्त्याची दयनीय अवस्था

Wani News
बाबापूर येथील जागृत गणपती मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अक्षरशः खड्यात गेला आहे! कायर ते बाबापूर दरम्यानचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलेला असून काही ठिकाणी तर रस्त्याचे अस्तित्वच लोपले आहे. यामुळे गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची प्रचंड परवड होत आहे. दुर्दैव म्हणजे, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळूनसुद्धा काम थांबवण्यात आले असून, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष जनतेच्या रोषास कारणीभूत ठरत आहे. The administration’s inexcusable negligence is causing public anger.

खराब रस्त्यांमुळे मंदिरात पोहोचणे हेच भाविकांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तसेच महिलांना कसरत करून, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे म्हणजे अपघातांची खुली निमंत्रणं बनली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सारंग बोथले, अतुल काकडे आणि संदीप गुरनुले यांनी दिलेल्या निवेदनात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांच्या मते, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असूनही, हे काम कोणाच्यातरी ‘मर्जीने’ थांबवण्यात आले आहे. हा प्रकार प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण असून, या मागे कोणाचा हस्तक्षेप आहे, हे तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Img 20250103 Wa0009
जनआंदोलनाची चेतावणी : प्रशासनाला इशारा

बाबापूर रस्त्याचे प्रश्न फक्त विकासाचे नाहीत, ते श्रद्धेच्या आणि जनतेच्या आत्मसन्मानाचे आहेत. भाविकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, त्यामुळे संबंधित विभागाने झोपेचं सोंग सोडून तत्काळ पावले उचलावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल, असा निर्वाणीचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
ROKHTHOK