Home Breaking News धोकादायक…. विजेच्‍या खांबावरुन टाकले जाताहेत 5 जी नेटवर्कचे केबल

धोकादायक…. विजेच्‍या खांबावरुन टाकले जाताहेत 5 जी नेटवर्कचे केबल

915

महावितरणचे दुर्लक्ष, दुर्घटना घडल्‍यास जबाबदार कोण ?

वणीः तंत्रज्ञानाच्या युगात झटपट कामे व्‍हावी याकरीता नेटवर्क वाढविण्‍याचे काम सुरु आहे. आज पासुन भारतात 5 जी सेवा सुरु करण्‍यात आली असुन त्‍याचे जाळे पसरविल्‍या जात आहे. माञ परवानगी नसतांनाही विजेच्‍या खांबावरुन धोकादायक स्थितीत केबल टाकण्‍याचे काम सुरू आहे. यावेळी एखादा अपघात घडल्‍यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्‍न उपस्थित होत असुन याकडे महावितरणचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

Img 20250422 wa0027

शनिवारी भारतात 5 जी नेटवर्क ची सुरूवात करण्‍यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्‍ते दिल्‍ली येथे या नविनतम नेटवर्कचे रितसर उदघाटन करण्‍यात आले. 5 जी सेवे मुळे संगणक, समाज माध्‍यम तसेच उदयोगधदयांना चांगलाच फायदा होणार आहे. सध्‍या प्रायोगीक तत्‍वावर देशातील 13 शहरात ही सेवा सुरु करण्‍यात आली आहे.

Img 20250103 Wa0009

नव्यानेच सुरू होत असलेल्या 5 जी सेवेचा लाभ देशातील प्रत्‍येक नागरीकांना मिळावा याकरीता युध्‍दपातळीवर नेटवर्क केबल टाकण्‍याचे काम सुरू आहे. गावखेडयात देखील हे नेटवर्क पोहचविण्‍याचा प्रयत्‍न सुरु असुन लवकरच याचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळणार आहे. लगतच असलेल्‍या छोरीया ले आउट मध्‍ये केबल टाकण्‍याचे काम संबधीत यंञणेच्‍या मार्फत केल्‍या जात आहे. माञ केबल टाकतांना कोणतीही दक्षता न घेता नियमबाहयरित्‍या काम होत आहे.

छोरीया लेआउट मधुन गेलेल्‍या महावितरणच्‍या 11 हजार केव्‍ही विद्युत वाहीनीच्‍या खांबावरुन 5 जी नेटवर्कचे केबल टाकल्‍या जात आहे. केबल टाकत असतांना विद्युत पुरवठा खंडीत न करताच काम सुरु आहे. त्‍यामुळे कामगारांच्‍या जीवीतांस धोका निर्माण होत असल्‍याचे दिसत आहे. यापुर्वी शहरात महावितरणच्‍या विज तारांचा स्‍पर्श होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तरी देखील याकडे महावितरणने दुर्लक्ष करणे हे न उलगडणारे कोडे आहे.

5 जी नेटवर्क चे केबल टाकणाऱ्या एजंन्‍सीने महावितरण विभागाकडून कुठल्‍याही प्रकारची परवानगी घेतली नाही. किंवा महावितरण कंपनीने दिली नाही. याबाबत त्‍यांना तोंडी कळविण्‍यात आले असुन सोमवारी लेखी स्‍वरूपात कळवून काम बंद करण्‍याचे आदेश देण्‍यात येणार आहे. काम बंद न केल्‍यास संबधीतांचे केबल कापणार आहे.
सुदर्शन इवनाते
सहायक अभियंता, विज वितरण, वणी