Home Breaking News भरधाव कारने दुचाकीला उडविले, एक ठार, दोघे जखमी

भरधाव कारने दुचाकीला उडविले, एक ठार, दोघे जखमी

4780

● नायगाव वळणावरील घटना

रोखठोक | अपघाताच्‍या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. बेजबाबदारपणे वाहने चालविणे जीवावर बेतत असुन तालु्क्‍यातील नायगाव जवळील वळणावर भरधाव कार ने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीस्‍वार ठार झाल्‍याची प्राथमिक माहीती असुन दोघे जखमी झाले आहे. ही घटना मंगळवार दि. 28 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजताच्‍या दरम्‍यान घडली.

Img 20250422 wa0027

वरोरा वरून वणीकडे येत असलेली कार क्रंमाक MP- 48- ZA- 2249 ही सुसाट वेगाने होती. नायगाव जवळील वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH- 29- BG- 5124 ला जबर धडकली. अपघात हा प्रचंड भिषण होता यात दुचाकीचा चुराडा झाला असुन कारचे बोनट तुटले आहे.

Img 20250103 Wa0009

नायगाव वळणावर घडलेल्‍या या अपघातात दुचाकीवरील एक तरूण ठार तर दोघे जखमी झाले आहे. अपघात होताच परीसरातील नागरीकांनी घटनास्‍थळी धाव घेतली.जखमींना तातडीने उपचारार्थ हलविण्‍यात आले. याप्रकरणी पोलीसांना सुचना देण्‍यात आल्‍या आहे. अपघातातील मृतक व जखमींची माहिती वृत्तलीहे पर्यंत प्राप्त झाली नव्हती.
वणी: बातमीदार