● गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू
रोखठोक | नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क जवळ भरधाव भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला उडवले. या अपघातात एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार दि. 23 मार्चला दुपारी 4: 30 वाजता घडली.

धीरज आत्राम (28)असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संदीप सिडाम (30) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ते दोघेही वांजरी येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी ते दोघे दुचाकीने वणीकडे येत असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या हायवा क्रमांक MH-29-BE-1816 ने दुचाकीला उडवले.
अपघात घडताच स्थानिकांनी पोलिसांना सूचित केले आणि जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तपासणीनंतर धीरज ला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर संदिप वर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.
वणी: बातमीदार