Home Breaking News भीषण…एसटी बसची दुचाकीला धडक

भीषण…एसटी बसची दुचाकीला धडक

1525

दुचाकीस्वार जागीच ठार

रोखठोक | दुचाकीने बोरी कडे जात असलेल्या 50 वर्षीय दुचाकीस्वाला एसटी बस ने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना अहेरअल्ली गावाजवळ शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर ला सकाळी घडली.

Img 20250422 wa0027

रामदास तुडमवार (50) हे झरी तालुक्यातील धानोरा येथील निवासी होते. त्यांचा धान्य व कापूस खरेदीचा व्यवसाय होता. याकरिता ते नेहमी प्रमाणे तो आपल्या दुचाकीने बोरी या गावाकडे जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली.

Img 20250103 Wa0009

अहेरअल्ली गावाजवळ रेल्वेने बोगदा तयार केला आहे. हा बोगदा अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. या बोगद्या बाबत सरपंच हितेश राऊत यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार सुद्धा केली आहे. विद्यार्थ्यांचा येण्याजाण्याचा हा मार्ग असून तक्रारीतून अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली होती.

घटनेच्या दिवशी परिवहन विभागाची बस क्रमांक MH- 40 -AQ- 6062 वणी वरून टाकळी ला जात होती. तर विरुद्ध दिशेने दुचाकी आली. बोगद्यामुळे एकमेकांना वाहन येत असल्याचे दिसले नाही आणि भीषण अपघात झाला. या घटनेत दुचाकीस्वारांचा दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.
वणी : बातमीदार