Home Breaking News सुवर्णसंधी…..सुवर्णसंधी…..पदवी प्रवेशा पासून वंचित विद्यार्थ्यांना BSC व B com साठी प्रवेश सुरू

सुवर्णसंधी…..सुवर्णसंधी…..पदवी प्रवेशा पासून वंचित विद्यार्थ्यांना BSC व B com साठी प्रवेश सुरू

अनुभवी प्राध्यापक, प्रशस्त इमारत

रोखठोक :- वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लॉयन्स वरिष्ठ महाविद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी बी.एस.सी. (प्रथम वर्ष) व बी. कॉम. (प्रथम वर्ष) इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. लॉयन्स वरिष्ठ महाविद्यालयाचे हे पहिले वर्ष असून वरील दोन्ही अभ्यासक्रमासाठी अत्यल्प वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे.

वणी परिसरात सध्या एकच महाविद्यालयात बी.एस.सी. व बी. कॉम. अभ्यासक्रम सुरु आहे. या महाविद्यालयात मर्यादित सीटमुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागत होता. त्यामुळे वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यावर्षी वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे.

वरिष्ठ महाविद्यालयात अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेपेरा मार्गावरील लॉयन्सच्या मालकीची भव्य व प्रशस्त इमारतीत हे महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. या इमारतीत भव्य क्रीडांगण, सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधासह अद्यावत संगणक कक्ष व उत्कृष्ट लायब्ररी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Img 20250103 Wa0009

* अधिक माहिती व प्रवेशासाठी *
9767306997, 8999681525, 8888717938
या क्रमांकावर संपर्क करा

बी.एस.सी. व बी. कॉम. (प्रथमवर्ष) अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी वणी लॉयन्स इंग्लिश मिडीयन ज्युनि. कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालय देशमुखवाडी, वणी व लायन्स वरिष्ठ महाविद्यालय, नांदेपेरा रोड वणी, जि. यवतमाळ या शाखेत त्वरित संपर्क साधावा किंवा सकाळी 9.00 वा. ते दु. 2.00 पर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश सुनिश्चित करा. असे आवाहन वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Previous articleभीषण…एसटी बसची दुचाकीला धडक
Next articleखासदार व माजी आमदारांची ‘बुलेटस्वारी’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.