● औचित्य स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे
वणी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, वणीत “आजादी की दौड” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिवस तथा शिक्षक दिनाच्या औचित्य साधून दिनांक 5 सप्टेंबर ला सकाळी सात वाजता आयोजन केले आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात SDO डॉ. शरद जावळे, SDPO संजय पुज्जलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संजय आत्राम हे प्रमुख पाहुणे असतील.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा, सचिव ॲड्.लक्ष्मण भेदी सहसचिव अशोक सोनटक्के वणी लायन्स चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष लायन शमीम अहमद, उपाध्यक्ष डॉ. के. आर. लाल सचिव महेंद्र श्रीवास्तव, पदसिद्ध सदस्य मंजिरी दामले हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
“आजादी की दौड” स्पर्धेत वणी विभागातील विद्यार्थ्यांनी व धावपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे आणि वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धेचे संयोजक व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण तथा क्रीडा विभागाचे संचालक प्रा.उमेश व्यास, शारिरीक शिक्षक प्रा.कमलेश बावणे, वणी लायन्स हायस्कूल येथील शारीरिक शिक्षक नाझिया मिर्झा यांचेसह दोन्ही आयोजन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.
वणी : बातमीदार