Home Breaking News वेकोलीच्या कामगार संघटनेत राजू उंबरकरांची वर्णी

वेकोलीच्या कामगार संघटनेत राजू उंबरकरांची वर्णी

621

*एचएमएस च्या प्रदेश महासचिव पदी निवड

वणी बातमीदार: वेकोलीच्या अधिनस्त कोळसा खाणीतील महत्वपूर्ण कामगार संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंद मजदूर सभेच्या कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा धडाडीचे तरुण नेते राजू उंबरकर यांना महाराष्ट्र महासचिव पदी निवड करण्यात आल्याने संघटनेच्या सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

Img 20250422 wa0027

वणीतील हॉटेल जन्नत मध्ये पदभार कार्यक्रम शुक्रवार दि. 20 ऑगस्ट ला संपन्न झाला. हिंद मजदूर सभा ट्रेड युनियन नि एका विशेष सभेचे आयोजन केले होते या प्रसंगी शिवकुमार यादव अध्यक्ष तथा जेबीसीसीआय सदस्य व फ्रान्सिस दारा जनरल सेक्रेटरी वेकोली हे उपस्थित होते. वणी परिसरात 13 कोळसा खाणी कार्यरत आहे. या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहे. मात्र सर्वाधिक सदस्य असलेली संघटना म्हणून हिंद मजदूर सभेचे नाव पुढे येते.

Img 20250103 Wa0009

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भातील प्रमुख नेते म्हणून उंबरकर यांची ओळख आहे. त्यातच त्यांचा वणी विधानसभा क्षेत्रात चांगलाच जनाधार आहे. सर्वसामान्य जनतेच्या हितार्थ ते आपला आवाज शासनदप्तरी सातत्याने बुलंद करतात त्या प्रमाणेच वेकोलीतील कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते लढतील अशी आशा व्यक्त होत आहे.