● 36 लाखाचा मुद्देमाल जप्त
● LCB ची धडाकेबाज कारवाई
चंद्रपूर शहरातील एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर LCB च्या पथकाने कारवाई केली. यावेळी जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये वणी येथील माजी नगरसेवकाचा समावेश असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर शहरातील बाबानगर येथील राजेश गुप्ता यांच्या घरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना मिळाली होती. त्या वरून LCB पथकाला सोबत घेऊन सापळा रचला होता.
गुप्ता यांच्या घरात जुगार सुरु होताच पोलिसांनी छापा टाकला असता पैसे लावून जुगार सुरू असल्याने गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे (29) रा. पेठ वार्ड राजुरा, राजेश रामचंद्र गुप्ता(44) महाकाली काॅलरी चंद्रपूर, प्रदीप दिनकर गंगमवार (41) महाकाली वार्ड चंद्रपूर, शेख आसीफ शेख चांद (30) रा. पारवा तर. घाटंजी यवतमाळ, नंदकुमार रामराव खापने (29) रा. कोलगाव ता. मारेगाव यवतमाळ, गणेश रामदास सातपाडे (35) रा. गडचांदूर, समिर सचिन संखारी (50), विवेक नगर, चंद्रपूर, आकाश चंद्रप्रकाश रागीट (30) लक्कडकोट राजुरा, गौरव लक्ष्मण बंडीवार (26) रा. नांदाफाटा जि. चंद्रपूर, श्रीनिवास रामलू रंगारी (50) रा. लालपेठ काॅलरी चंद्रपूर, सुरेश पुनराज वावरे (53) बाबुपेठ चंद्रपूर यांचा समावेश आहे.
या कारवाईत वणी नगर पालिकेचे माजी नगरसेवक हाफिज रेहमान खलील रेहमान (53) गुरूनगर, यांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाहीत 36 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम 1 लाख 97 हजार 250 रूपये, 11 मोबाईल, तीन चार चाकी गाड्या, तीन दुचाकी गाड्या असा 36 लाख 57 हजार 750 रूपयाचा मुद्देमाल जुगारादरम्यान हस्तगत करण्यात आला आहे.
चंद्रपूर: बातमीदार