Home Breaking News शैक्षणिक, ओबीसी व विदर्भ चळवळीतील “हिरा”

शैक्षणिक, ओबीसी व विदर्भ चळवळीतील “हिरा”

● बहुजनांचे कणखर नेतृत्‍व डॉ. अशोक जीवतोडे

582
C1 20240610 20122814
बहुजनांचे कणखर नेतृत्‍व डॉ. अशोक जीवतोडे

Political News | डॉ. अशोक जीवतोडे हे वडील स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांना राजकीय गुरु मानतात. उच्च शिक्षण, दांडगा जनसंपर्क, निवडणुकीचा अनुभव, अजात शत्रू व सुपरिचित हसतमुख उमदे व्यक्तीमत्व, लोकांना सहज उपलब्ध होणारे तथा लोकांची कामे सहज करणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. अशोक जीवतोडे चांगलेच परिचित आहेत. Academic, OBC and diamond in Vidarbha movement.. Dr.  Ashok Jivatode

Img 20250422 wa0027

बहुजन समाजाच्या उत्थानाकरीता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व ओबीसी चळवळीतुन ते प्रामाणीक कार्य करताहेत. सर्वसामान्‍यांचे जनहितार्थ काम करण्याची सचोटी, सातत्य व प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे. शिक्षण व सामाजिक चळवळ सातत्‍याने राबवून त्‍यांनी बहुजनांचे कणखर नेतृत्‍व म्‍हणुन स्‍थान मिळवले आहे. राजकीय क्षेत्रातून संवैधानिक पदावर जाता आले तर बहुजनांचे कार्य करणे सोपे जाईल, अधिक ताकदीने पूर्व विदर्भात बहुजनांकरीता संधी उपलब्ध करून देता येईल, असे त्यांना सतत वाटते. अनेक दशकापासून अविरतपणे त्यांचे कार्य सुरू असुन बहुजन समाजाला एक सशक्‍त प्लॅटफॉर्म मिळाला आहे.

Img 20250103 Wa0009

पश्चिम महाराष्ट्रातील कर्मवीर भाऊराव पाटील, पश्चिम विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या खालोखाल शैक्षणिक क्षेत्रात पूर्व विदर्भात माजी आमदार श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी शैक्षणिक कार्यात भरीव काम केले असुन या परिसरातील घराघरात शिक्षण पोहोचविले. त्या कुटुंबात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा जन्म झाला. एम. कॉम., एम. ए. (अर्थशास्त्र), एम. फिल., एम. एड., पी.एच. डी. (शिक्षण व वाणिज्य) असे शिक्षण घेवून शिक्षकी पेशात पदार्पण करून 1992 पासून तर आजतागायत ते पूर्व विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सेक्रेटरी म्हणून यशस्वीरीत्या कार्यरत आहे.

संस्‍थेचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना सामाजिक जवाबदारीचे भान ठेवून त्यांनी कुणबी, शेतकरी समाजाला एकत्र करण्याचे काम जानेवारी 2008 मध्ये केले व समाजकारणाला मोठ्या हिरहिरीने सुरुवात केली. व हे कार्य समाजाची व जनतेची स्व. श्रीहरी जीवतोडे यांच्यावर असलेली श्रध्दा व निष्ठा यामुळे डॉ. अशोक जीवतोडे हे करू शकले. त्यानंतर वडीलांप्रमानेच विदर्भ राज्याचा ध्यास घेवून एड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य वेगळे व्हावे व विदर्भ राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जनजागृती व व्याख्याने आयोजित करण्यात आले व या कार्यात लोकांचा सहभाग वाढला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे आंदोलन उभे केले. या राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी समाजाच्या कार्यात कधी देवेंद्रजी फडणवीस, हंसराजजी अहिर, शरदजी यादव, बंडारू दत्तात्रय, तेजस्वी यादव,  इंद्रजित सिंग, हुकूम देव नारायण सिंह व देश पातळीवरील अनेक राजकीय तथा सामाजिक नेत्यांसोबत सहभाग नोंदविला.
Rokhthok news

सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अजात शत्रू म्हणून विदर्भातील सुपरिचित असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अशोक जीवतोडे यांना “रोखठोक” परिवारांकडून वाढदिवसांच्‍या हार्दिक शुभेच्‍छा