Home Breaking News निलेश चौधरी यांना राष्ट्रनिर्माता पुरस्कार

निलेश चौधरी यांना राष्ट्रनिर्माता पुरस्कार

● अमरावती येथे पुरस्काराचे आयोजन

C1 20240610 23055545

अमरावती येथे पुरस्काराचे आयोजन

Wani News | अमरावती येथे राज्यस्तरीय शिक्षक सन्मान संघ महाराष्ट्र प्रणित शिक्षक सन्मान अभियाना अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा 16 जून ला अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात उत्कृष्ट शिक्षक, सामजिक, प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व काही संस्थाचा राष्ट्रनिर्माता पुरस्कार 2024 देवून सन्मान करण्यात येणार असून वणीतील युवा पत्रकार निलेश चौधरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. Young journalist Nilesh Chaudhary will be honored.

राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 40 उत्कृष्ट शिक्षक, सामजिक, प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व काही संस्थाचा राष्ट्रनिर्माता पुरस्कार 2024 देवून सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील युवा पत्रकार निलेश अशोकराव चौधरी यांचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेने जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील शिक्षक व समाज बांधवांनी या महत्वाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक सन्मान संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर ,राज्य उपाध्यक्ष संतोष बोरकर यांनी केले आहे. वणीतील युवा पत्रकाराला मिळणारा हा सन्मान हा वणीकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे बोलल्या जात आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009