● निधी किंवा तांत्रिक अडचणींचे कारण देऊन पाणीप्रश्न प्रलंबित ठेवू नका, अधिकाऱ्यांना खडसावले….
ROKHTHOK Zari-Jamni
That.. the village’s water problem will be solved in eight days ! झरी तालुक्यातील कटलीबोरगाव येथील तीव्र पाणीटंचाईची दखल घेत वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ग्रामस्थांशी संवाद साधत आमदार देरकर यांनी पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
निधी किंवा तांत्रिक अडचणींचे कारण देऊन पाणीप्रश्न प्रलंबित ठेवू नका. विशेष निधीची गरज भासल्यास आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची माझी तयारी आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले.
गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याची सूचना त्यांनी केली. प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करण्यावरही त्यांनी भर दिला.
यावेळी गौरव पंधरे, बाळू दुधकोहळे, मधुकर भोयर, बंडूभाऊ आडे, नामदेव कुडमथे, सतीश कोडापे, सागर कुडमथे, गुणवंत आत्राम, अतुल कुमरे, किरण कोडापे (पोलीस पाटील), चंदा आत्राम (सरपंच, हिवरा बु.), अनिल टेकाम (उपसरपंच), भिमराव टेकाम, भूसेवार, देवीदास अडपावार (ग्रामसेवक), अभियंता मिर्झा, महिंद्रा मेश्राम, इंद्रजीत मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






