Home Breaking News धक्कादायक.. धबधब्यात बालकाचा बुडून मृत्यू

धक्कादायक.. धबधब्यात बालकाचा बुडून मृत्यू

● निसर्गरम्य ठिकाणी गेले होते चौघे

1553
C1 20240811 18294530

निसर्गरम्य ठिकाणी गेले होते चौघे

Sad News | यवतमाळ शहरालगत असलेल्या किटा- कापरा परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी धबधबा बघायला सोळा सतरा वयोगटातील चार मुले गेली होती. जलतरणाचा मोह अनावर झाला आणि चौघेही पाण्यात उतरले. पोहता येत नसल्याने ते सर्व बुडायला लागले, स्थनिकांनी तिघांना वाचवले मात्र दहावीत शिकत असलेला 16 वर्षीय बालक मृत्युमुखी पडला. ही दुर्दैवी घटना रविवार दिनांक 11 ऑगस्टला दुपारी घडली. या घटनेने कमालीची शोककळा पसरली आहे. Locals rescued the three but the 16-year-old boy died.

Img 20250422 wa0027

अर्णव उर्फ शाम सुनील जोशी (16) असे मृतक बालकाचे नाव आहे. राहणार महादेव नगर, वडगाव, यवतमाळ तो आपल्या तीन सवंगड्यासह किटा कापरा परिसरातील धबधबा बघायला गेलं होते. त्यांना पोहण्याचा मोह अनावर झाला. चोघेही पाण्यात उतरले, त्यांना नीट पोहता येत नव्हते तसेच पाण्याचा अंदाज सुध्दा आला नाही. यात ते सर्व बुडायला लागले ही बाब तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांच्या लक्षात आली. त्याने आरडाओरडा करत अन्य नागरिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढले.

Img 20250103 Wa0009

पाण्यात मुलगा बुडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. पोलीस व महसूल प्रशासनाला कळविण्यात आले. बचाव पथक घटनास्थळी पोहचले. नैसर्गिक आपत्ती विभागाचे कर्मचाऱ्यांना दोन तास प्रयत्न करूनही मृतकाचे शव काढता आले नाही मात्र गावातील प्रदीप बोरकर नामक तरुणाने खोल पाण्यात अडकलेल्या अर्णव चा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून शव उत्तरीय तपासणी करिता पाठवला आहे.
Rokhthok News

(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)