Home Breaking News बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळला

बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळला

● शिरपूर पोलिसांनी केली शोधाशोध

C1 20240811 14063760

शिरपूर पोलिसांनी केली शोधाशोध

Sad News | शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कुरई येथील 48 वर्षीय व्यक्ती कोणाला काहीच न सांगता शनिवारी पहाटे घरून निघून गेला. दिवसभर घरच्या मंडळींनी शोधाशोध केली मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. याप्रकरणी पोलिसात तक्रार केली असता तपासाची चक्रे फिरली आणि गावलगतच्या विहिरीत पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आला. The body of the missing person was found in the well.

अनील भाऊराव पाचभाई (48) असे मृतकाचे नाव आहे, ते कुरई या गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. शनिवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ते घरातून निघून गेले. घरची मंडळी चिंताग्रस्त झाली सर्वत्र त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु त्याचा शोध लागेना आखेर घरच्यांनी शिरपुर पोलीस स्टेशन गाठले आणि झालेली हकीकत पोलीसांसमोर मांडली.

पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. रविवारी सकाळी पोलिसी नजर गावालगत असलेल्या विहिरीवर स्थिरावली. त्यात बघितले असता अनिल चा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने शव पाण्या बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. त्याने आपले जीवन का संपवले हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009