Home Breaking News महाविद्यालयीन तरुणांची आत्महत्या

महाविद्यालयीन तरुणांची आत्महत्या

● गुरूनगर येथील घटना

4219
C1 20240216 10040404

गुरूनगर येथील घटना

Sad News Wani :- मारेगाव येथील महाविद्यालयात बीएससी (BSC) द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी ला पहाटे उघडकीस आली. A college youth committed suicide by hanging himself.

Img 20250422 wa0027

विवेक उमाकांत बोन्डे (20) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो तालुक्यातील मेंढोली येथील रहिवासी आहे, मारेगाव येथील महाविद्यालयात बीएससी (BSC) द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. शिक्षणा साठी तो आणि त्याची बहीण गुरूनगर परिसरात असलेल्या खंदारे यांच्या घरी भाडेतत्त्वावर राहत होते.

Img 20250103 Wa0009

गुरुवारी त्याची बहीण गावाला गेल्याने तो एकटाच घरी होता. त्याने रात्री ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब शुक्रवारी पहाटे उजेडात आली. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. त्याच्या निधनाने मेंढोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
ROKHTHOK NEWS