Home Breaking News वर्धा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

वर्धा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

पाटाळा पुलाजवळील घटना

वणी: यवतमाळ- चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात अंदाजे 55 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले असून ही बाब सोमवार दि. 20 जून ला सकाळी उघडकीस आली.

पाटाळा पुला जवळून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींला नदीपात्रात मृतदेह तरंगताना दिसला. त्याने ही बाब लगतच्या नागरिकांना कळवली. याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करताहेत.

C1 20260430

अज्ञात व्यक्ती तोल जाऊन नदीपात्रात पडल्याचे प्रथमदर्शनी बोलल्याजात आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सूत्र हलवली असून नेमका हा व्यक्ती कोण हे उघड होणार आहे.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009