Home Breaking News MNS leader : उंबरकरांसह मनसे पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

MNS leader : उंबरकरांसह मनसे पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

● शेतकऱ्यांच्या न्‍याय हक्‍कासाठी केले होते आंदोलन

638
C1 20250221 17164853
शेतकऱ्यांच्या न्‍याय हक्‍कासाठी केले होते आंदोलन

MNS NEWS | आठ वर्षांपूर्वी शेतपिकांवरील फवारणीमुळे तब्‍बल 25 शेतकरी शेतमजुरांचा मृत्‍यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक मदत, देण्यात यावी, कीटकनाशके बनविणाऱ्या कंपनी, विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर तिव्र आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या न्‍याय हक्‍कासाठी केलेल्‍या आंदोलन प्रकरणी आंदोलनकर्त्‍यावर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले होते. याप्रकरणी न्‍यायालयाने MNS leader राजु उंबरकरांसह आंदोलनकर्त्‍यांची (acquittal) निर्दोष मुक्‍तता केली आहे. Court acquits protesters including MNS leader Raju Umberkar

Img 20250422 wa0027

यवतमाळ जिल्ह्यात बोगस कीटकनाशक फवारणी मुळे सन 2017 साली जिल्ह्यात 22 ते 25 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक शेतकऱ्यांना अपंगत्व, त्वचेचे रोग व अन्य आजारांना सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी MNS leader राजु उंबरकर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह जिल्‍हा कृषि अधिकारी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांच्या न्‍यायहक्‍का करीता विविध मागण्‍या रेटून धरण्‍यात आल्‍या होत्‍या.

Img 20250103 Wa0009

कृषी विभागाने कीटकनाशक उत्पादक कंपनी, विक्रेते यांच्याशी असलेल्या अर्थपुर्ण संबंध उघड होवु नये यासाठी हे आंदोलन दडपण्‍याच्‍या दृष्टीने या आंदोलनात सहभागी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा यांसारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्याय प्रविष्ठ होते.

जिल्हा सत्र न्यायालयाचे न्‍यायमुर्ती यांच्या दालनात नुकतीच अंतिम सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्‍यायमुर्तीनी सरकारी वकील व  प्रतिवादी वकील यांची बाजु ऐकुन घेत या प्रकरणातील MNS leader राजु उंबरकर, मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्यासह 8 जणांची acquittal निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने ॲड.राजेंद्र साबळे व ॲड. अमित बदनोरे यांनी बाजु मांडली.

शेवटी विजय सत्याचाच झाला

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना अस्मानी,  सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात बोगस बियाणे, कीटकनाशके नेहमीच त्यांच्या माथी मारल्या जात आहे. माञ शेतकऱ्यांना न्याय मिळवुन  देण्यासाठी मनसे नेहमीच अग्रेसर राहिली आहे. परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेले कृषी प्रशासनाने आपले पाप लपविण्यासाठी, आंदोलनकर्त्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही चालवली होती. अशा दडपशाहीला भिक न घालता माझ्या सर्व सहकाऱ्यांनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली. मा. न्यायालयाने आमची acquittal निर्दोष मुक्तता केली. आठ वर्षाच्या लढ्याला आज यश येवुन शेवटी विजय हा सत्याचाच झाला आहे. या निर्णयामुळे भविष्यात शेतकरी हिताचा लढा अधिक तीव्र करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देवु.

राजु उंबरकर
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

● यांचा होता आंदोलनात समावेश ●

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर मनसे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, गजानन भालेकर, अनिल हमदापुरे,  अभिजित नानवटकर, शेख सादिक, सचिन येलगंधेवार, शेख साजीद, कुणाल जतकर यांचा समावेश होता.जिल्हा न्यायालयाने या सर्वांची आज acquittal निर्दोष मुक्तता केली आहे.
Rokhthok News

Previous articleaction of lcb : घरफोडी व चोरीच्या 11 गुन्ह्याचा छडा
Next articleमटका अडयावर धाडसत्र, सात अटकेत
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.