● शेजाऱ्यानेच वाद घालून हाताला घेतला चावा
Wani News | नवीन लालगुडा येथे वास्तव्यास असलेल्या शेजाऱ्यात शुक्रवारी सायंकाळी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या घटनेत शाब्दिक वादावदीनंतर शेजाऱ्याच्या हाताला चावा घेत अंगठा तोडल्याचा प्रकार घडला. A case of biting the neighbor’s hand and breaking the thumb happened.

मोहन चंद्रीका गुप्ता (35) अधिक एक महिला यांचेवर गुन्हा दाखल झाला असून ते नवीन लालगुडा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी संतोष राजाराम एनपल्लीवार (44) हे राहतात. घटनेच्या दिवशी आरोपीने वॉल कंपाउंड ची भिंत पाडली. यामुळे दोन्ही शेजाऱ्यात वाद झाला. शाब्दिक वादानंतर आरोपी आक्रमक झाले आणि चक्क तक्रारकर्त्याच्या हाताचा अंगठा चावा घेऊन तोडला.
या घटनेत संतोष राजाराम एनपल्लीवार यांनी वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या आदेशात PSI रत्नपारखी करताहेत.
ROKHTHOK NEWS