● सुरेश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन
Sad News | परमडोह येथील निवासी, सामाजिक कार्यकर्ते तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांचे वडील सुरेश काकडे यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी ला पहाटे 2 वाजता दुःखद निधन झाले. MP Pratibha Dhanorkar’s father Suresh Kakade due to brief illness
सुरेश काकडे हे परमडोह येथील प्रतिष्ठित शेतकरी होते तसेच सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असायचे. काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांचेवर नागपूर येथे उपचार सुरू होते. प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांचे मध्यरात्री निधन झाले.
खा. प्रतिभा धानोरकर व प्रवीण काकडे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात मोठा आप्तस्वकीय परिवार आहे. त्यांचेवर गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी परमडोह येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )






